निराशा


सोनेरी तो डोंगर दिसला
भास सोन्याचा मजला झाला

सोडून सारी सुख शांती
चाललो डोंगरावर पाहायला सोन्याची हांडी

 तहान भूक हरवून सारी, लागलो डोंगर चढायला
दगड मातीचा पाहुनी धुराळा, लागलो मनी कुढायला

ना सापडले सोने ना सापडला हिरा इथे
ओसाड उजाड माळरान फक्त बोडक्यावरती माध्यमाचे ऊन भाजके

पावलागणीत समजत गेलो ,पाहिले उघड्या नयनांनी
घात केला होता माझा ,सूर्याच्या त्या तिरप्या किरणांनी .

आता विसाव्याला झाडही मिळेना खुरट्या काटेरी झाडाची पैदास फक्त
जाब विचारावा कोणाला , सूर्याच्या त्या किरणांनी दिला होता फक्त आभास सोन्याचा 

Comments

Post a Comment